Tuesday, July 14, 2009

पोलिस आयुक्तांना पत्र

प्रकाश गो. घाटपांडे
डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॊलनी, कोथरुड पुणे ४११०२९
e-mail:- prakash.ghatpande@gmail.com
mobile no. 9923170625

दिनांक - 14 जुलै 2009


प्रति,
मा. पोलिस आयुक्त
पुणे शहर


विषय :-सेवानिवृत्तांची देयक बिले अदा करण्यात अक्षम्य विलंब होत असलेबाबत......

संदर्भ:-
१) दैनिक. सकाळ मुक्तपीठ ३० जुलै २००७ नुसार पोलिस आयुक्तांना अनावृत्त पत्र
२) मा. महालेखाकार मुंबई कार्यालय यांचे PR9/Ch4/P/09/ORD/60163478 दि १२/५/२००९ चे वेतनवसुली रद्द केल्याचे पत्र
३) मा. सहा. पो.आयुक्त. बि.सं पुणे शहर यांचे कडील जा.क्र. ९७३ दि. २८ / ५ / २००९ नुसारचा अर्ज
४) मा. सहा.पो.आयुक्त बि.सं पुणे शहर यांचे कडील जा.क्र. १२१५ दि.जुलै २००९

अर्जदार:- प्र.गो.घाटपांडे (स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक [ASI] बिनतारी विभाग पुणे शहर) पीपीओ क्र. ११०७०१३१८२६

मा.महोदय
मी रेडिओ यांत्रिक [सहा. पोलिस उपनिरिक्षक बि.सं (अभियांत्रिकी) ] या पदावरुन दि. ३१.०३.२००७ (कार्यालयीन वेळेनंतर) पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवरुन स्वेच्छानिवृत्त झालो. संदर्भ क्र. १ नुसार मला निवत्तीवेतन मिळण्यास या अगोदरच त्रास झाला होता. त्यानंतर संदर्भ क्र.२ नुसारा आगाउ वेतनवाढीबद्दल झालेल्या अतिप्रदान रक्कमेची वसुली (रक्कम रु ७६,६५३/- [ श्याहत्तर हजार सहाशे त्रेपन्न]) रद्द झाल्याबाबत पत्र महालेखाकार कार्यालयाकडुन आपणास पाठवले आहे.वस्तुत: या पत्रानंतर सदर रक्कमेची झालेली रिकव्हरी मला परत देणेसाठी कार्यालयाने आपणहुन बिल काढणे अपेक्षित होते.परंतु ते काढल्याने मी संदर्भ क्र३ नुसार आपल्या कार्यालयाला मी विनंती अर्ज केला. त्यावर काही कार्यवाही न झाल्याने मी पुन्हा संदर्भ क्र ४ नुसार स्मरण पत्र पाठवले परंतु सदर बिल काढण्याबाबत सहा.पो.आयुक्त बि.सं पुणे शहर यांना कुठलेही निर्देश प्राप्त झाले नसल्याचे समजले.पुणे ट्रेजरीला सदर बिल कार्यालयाकडुन सादर न झाल्यास ते अदा करण्याची प्रक्रिया पुणे ट्रेजरी कडुन होउ शकत नाही असे ट्रेजरी अधिका-यांनी सांगितले. तरी याबाबत झालेला विलंब लक्षात घेउन सदर प्रकरणास का विलंब झाला आहे याची चौकशी होउन बिल तातडीने मिळण्यास विनंती आहे.

आपला विश्वासू

(प्र.गो.घाटपांडे
स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक [ASI], बिनतारी संदेश विभाग पुणे शहर)
प्रत-मा.महालेखाकार मुंबई