Wednesday, January 30, 2008

पुणे पोलिस डॉट कॉम... नॉट अपडेट!

दैनिक सकाळ दि.३० जाने २००८ ची बातमी


पुणे पोलिस डॉट कॉम... नॉट अपडेट!

पुणे, ता. २९ - "सायबर सेल' असणाऱ्या शहर पोलिस दलाची "पुणे पोलिस डॉट कॉम' ही वेबसाइट गेल्या अनेक महिन्यांपासून कालबाह्य माहितीमुळे निरुपयोगी झाली आहे. पुण्याचे सहआयुक्त प्रभातरंजन असल्याचेच या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. ......
शहर पोलिसांची २००२च्या सुमारास पुणे पोलिस वेबसाइट सुरू झाली. त्यानंतर सुमारे तीन वर्षे सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, जून २००५ नंतर "वेबसाइट'कडे शहर पोलिसांकडून दुर्लक्ष झाले. शहरात पोलिसांचा सायबर सेल विभाग असून, त्यांच्या सायबर लॅबचेही गेल्या वर्षी उद्‌घाटन झाले. शहरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या लॅबमधून प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, घरच्या वेबसाइटकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाले आहे.

पुणे पोलिसांच्या वेबसाइटचा आढावा घेतल्यावर प्रभातरंजन हे सहआयुक्त असल्याचे दिसून येते. त्याची "सीआयडी'मध्ये बदली होऊन आता ते औरंगाबादमध्येही नव्या नियुक्तीवर पोचले आहेत. त्याचप्रमाणे परिमंडळ दोनचे उपायुक्त म्हणून अनंत शिंदे यांचेच त्यावर नाव आहे. असाच प्रकार वाहतूक, गुन्हे व विशेष शाखेच्या बाबतीत झाला आहे. सहायक आयुक्त व निरीक्षक दर्जाच्या बदल्या झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची अद्याप नावे आहेत. वाहतूक शाखेच्या बाबतीतही असेच झाले आहे. १९९८ ते मे २००५ पर्यंतच्या अपघातांची व कारवाईची माहिती त्यावर आहे. मात्र, त्यानंतरचे तपशील नाहीत.

""पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी वेबसाइटवर माहिती दाखल करण्याचे काम खासगी संस्थेला दिले होते. त्या संस्थेकडून ते काम मोफत होत असे. परंतु, नंतर काही कारणामुळे त्या संस्थेने हे काम बंद केले. त्यामुळे वेबसाइट अपडेट झालेली नाही. याबाबत खासगी कंपन्यांची मदत मागण्यात आली आहे,'' असे सूत्रांनी सांगितले.

एक नागरिक मधुकर माझिरे यांनी या वेबसाइटचा नुकताच आढावा घेतला. त्यात अपुरी माहिती दिसून आली. त्याशिवाय "महाराष्ट्र पोलिस' असा "सर्च' दिल्यास परदेशातील पोलिसांची वेबसाइट उघडते, असे दिसून आल्याचे त्यांनी कळविले आहे. पुणे पोलिसांच्या वेबसाइटवरून पासपोर्ट चौकशी, माहिती अधिकार अर्जाचा नमुना व ई-मेलद्वारे तो पाठविण्याची व्यवस्था पोलिसांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याशिवाय विविध पोलिस परवानेही ई-मेलद्वारे देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

"लवकरच सुरू करू'
या वेबसाइटबाबत अतिरिक्त आयुक्त राजिंदरसिंग यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ""सध्या महाराष्ट्र पोलिसांची वेबसाइट अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यातच बंद पडलेली पुणे पोलिसांचीही वेबसाइट समाविष्ट केली जाईल. हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.''

Saturday, January 12, 2008

शिवाजीनगर पोलिस मुख्यालय

Picture
शिवाजीनगर पोलिस मुख्यालय , पुणे
स्वेच्छानिवृत्तीनंतर मित्र मैत्रिणींना भेट. बघा किती आनंद झालाय त्यांना आणि मलाही !
दि. ९ जाने २००८

WEB 2.0