Thursday, December 4, 2008

वेतन वसुली

प्रकाश गो. घाटपांडे
डी २०२, कपिल अभिजात, डहाणुकर कॊलनी, कोथरुड पुणे ४११०२९
http://faljyotishachikitsa.blogspot.com
दिनांक - ४ डिसेंबर २००८

प्रति,
१) मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर
२) मा. अप्पर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस बिनतारी संदेश विभाग म.रा. पुणे

विषय :- वेतन वसुली, वेतनसुनिश्चिती व निवृत्तीवेतन बाबत……


संदर्भ:- १)मा. संचालक पो बिनतारी संदेश विभाग यांचे कडील जा.क्र. ई /प्रलि-१/आगाउ वेतनवाढ वसुली/४०२१/ २००८ दि.१९.८.२००८

२) मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ औरंगाबाद यांनी मूळ अर्ज क्र. ६४७ / ९६ वर दिनांक ०६.१२.२००७ रोजी दिलेला निर्णय
३) महाराष्ट्र शासन गृह विभाग, यांचेकडील पत्र क्र. पी डब्लु एस ०१९६ / प्र.क्र ३४ / पोल-४ दि. १३.०८.२००८

४) पुणे शहर पो.नोटीस दि. ९/८/२००७ पान नं १७२५ परि.क्र. १०८ आस्था ३(५)

५) मा. सहा. पो.आयुक्त. बि.सं पुणे शहर यांचे कडील जमा नं ३० दि.१३.११.२००७ नुसार पुणे कोषागारात भरणा केलेल्या रक्कमेची पावती

अर्जदार:- प्र.गो.घाटपांडे (स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक बिनतारी विभाग पुणे शहर) पीपीओ क्र. ११०७०१३१८२६

मा.महोदय
मी रेडिओ यांत्रिक [सहा. पोलिस उपनिरिक्षक बि.सं (अभियांत्रिकी) ] या पदावरुन दि. ३१.०३.२००७ (कार्यालयीन वेळेनंतर) पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आस्थापनेवरुन स्वेच्छानिवृत्त झालो. निवृत्ती वेतन व तदानुषंगिक लाभ मिळण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून संदर्भ क्र. ४ नुसार वेतन पडताळणी पथक पुणे यांनी आक्षेप घेतल्याने माझ्या वेतन निश्चितीत दुरुस्ती करण्यात आली. सदर दुरुस्ती ही रेडीओ यांत्रिक पदाच्या खातेनिहाय परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल दिलेल्या आगाउ वेतन वाढीबाबत होती. सदर वेतनवाढ अग्राह्य मानुन माझी वेतन निश्चिती केली गेली. त्यामुळे अतिप्रदान झालेली रक्कम रु ७६,६५३/- [ श्याहत्तर हजार सहाशे त्रेपन्न] ही वसुल करुन संदर्भ क्र. ५ नुसार शासकीय कोषागार पुणे येथे दि. १४.११.२००७ रोजी भरण्यात आली. सदर वसुलीची बाब न्याय प्रविष्ट होती. सदर वसुली बाबत संदर्भ क्र. २ अन्वये लागलेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठ यांचा लागलेला निकाल, संदर्भ क्रं ३ अन्वये वसुली बाबतचे गृह विभागाचे पत्र व संदर्भ क्र. १ अन्वये संचालक पो. बि.सं विभाग म.रा यांचे वसुली न करण्या बाबतचे आदेश येईपर्यंत माझ्या निवृत्तीचे वेळी अतिप्रदान ठरवलेल्या वेतनाची वसुली होउन गेली होती. म्हणजेच मी आत्ता निवृत्त झालो असतो तर माझी ही वसुली झाली नसती.
या वेतन वसुली बाबत कारणीभुत ठरणारा घटक म्हणजे खाते निहाय परिक्षा पास झाल्या मुळे दिलेली आगाउ वेतनवाढ हा होय. ज्याचे साक्षेपी विश्लेषण संदर्भ क्र. २ मध्ये न्यायाधिकरणाने केले आहे.तरी या अर्जाद्वारे सर्व संबंधितांना माझी विनंती आहे कि
१) संदर्भ क्र. ४ नुसार वेतन दुरुस्ती पुर्ववत करुन संदर्भ क्र. ५ नुसार केलेली वसुली रक्कम रु ७६,६५३/- [श्याहत्तर हजार सहाशे त्रेपन्न] ही मला परत मिळावी
२) सदर वसुली वेतन दुरुस्ती मध्ये (संदर्भ क्र ५) कमी केलेल्या दोन वेतनवाढी मुळे निर्माण झाली होती. निवृत्तीचे वेळी माझे मूळ वेतन ७१२५/- होते. ते दोन वेतनवाढ कमी करुन ६८७५/- केले गेले. त्यामुळे माझे निवृत्तीवेतन हे ६८७५/- यावर निश्चित करण्यात आले. संदर्भ क्र. २,३ व १ नुसार आता माझे निवृत्ती वेतन हे ७१२५/- या शेवटच्या वेतनावर निश्चित करण्याची गरज आहे.या आधारे निवृत्तीवेतन सुनिश्चित करुन निवृत्तीवेतन व तदानुषंगिक लाभ यांच्यातील देय फरकाचा परतावा मला मिळावा.
सदर दुरुस्ती ही ६ व्या वेतन आयोगाच्या न्याय्य अंमलबजावणी प्रक्रियेशी थेट संबंधित आहे. सबब या विनंती अर्जाचा प्राधान्याने, गांभीर्याने, सत्वर विचार करावा व हा विनंती अर्ज अंमलबजावणी होईपर्यंत निकाली काढू नये ही विनंती.


सहपत्रे - संदर्भ क्र. १ ते ५ ची झेरॊक्स प्रत
आपला विश्वासू

(प्र.गो.घाटपांडे)
स्वेच्छानिवृत्त रेडिओ यांत्रिक, बिनतारी संदेश विभाग
पुणे शहर
प्रत - महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन, पुणे (माहितीस्तव)

No comments: